एका वर्षात दोन तर आतापर्यंत पाचवी चोरी
पोलिसांना मात्र काहीच मीळेना
कुरणखेड – योगेश विजयकर
अकोला जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या संस्थांवर चोरीच्या घटना थांबता थांबेना काल मध्यरात्री सुद्धा चोरांनी या मंदिर परिसरातील दोन मुख्य दानपेटीवर डल्ला मारला संपूर्ण जिल्ह्यात खडबड उडाली आहे
बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय राज्य महामार्गावर कुरणखेड येथील श्री चंडिका देवी संस्थान हे जिल्ह्यात प्रसिद्ध संस्थान आहे येथे रोज अनेक भाविक दर्शनासाठी येजा करत असतात त्याचबरोबर नवरात्र मध्ये सुद्धा या ठिकाणी हजारो भाविकांची यात्रा या ठिकाणी भरत असते या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम विवाह सोहळे कुरणखेड येथील श्री चंडिका देवी संस्थान वर होत असतात मात्र ता.३० मध्यरात्री १ ते २ च्या मधात चोरी झाली मंदिराच्या मुख्य हॉलमधील पेटी, हनुमान मंदिर मधील पेटी अशा दोन पेट्या चोरांनी फोडल्या आहेत यामध्ये अंदाजे ६० ते ७० हजार रुपयांची रक्कम असल्याचे संस्थांच्या वतीने सांगण्यात आले विशेष एक पेटी वरून खाली आणून खालच्या हॉलमध्ये फोडली आहे चंडिका देवीवर रात्रीला चौकीदार असतांना सुद्धा ही चोरीची घटना घडली आहे येथे आतापर्यंत पाच चोरीच्या घटना घडल्याचे समोर येत आहे त्यामुळे बोरगाव मंजू पोलिसावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या घटनेचा तपास बोरगाव मंजू पोलीस निरीक्षक अनिल गोपाल, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, एलसीबी पोलीस उपनिरीक्षक दशरथ बोरकर, हेड कॉन्स्टेबल गोकुळ चव्हाण, स्वप्निल खेडकर, आकाश जंजाळ,अन्सारी, अक्षय देशमुख करत आहे वृत्त लिहेपर्यंत बोरगाव मंजू पोलिसात फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती
या अगोदर सुद्धा चोरीच्या विविध घटना याच मंदिर परिसरामध्ये या अगोदर सुद्धा मध्यरात्रीच्या दरम्यान विविध वेळा चोरीच्या घटना झाल्या आहे त्यामध्ये आतापर्यंत लाखो रुपयांची चोरी या मंदिर परिसरात झाली आहे गेल्या सहा महिन्या अगोदर सुद्धा 27/ 4 /2025 रोजी श्री चंडिका देवी संस्थान वर चोरीची घटना घडली होती यामध्ये सुद्धा हजारो रुपयांची रक्कम चोरांनी लंपास केली आहे दरवर्षी होणाऱ्या या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे एवढ्या चोरी होऊन सुद्धा पोलीस खाली हात आहेत
बोरगाव मंजू पोलीस संशयाच्या भोवऱ्यात आतापर्यंत या मंदिर परिसरामध्ये पाच वेळा चोरी झाल्या आहेत यामध्ये लाखो रुपयांची रक्कम आतापर्यंत चोरी झाली आहे कित्येक वेळा या घटनेचा तपास होतो, डॉग स्काट येतात अनेक विभागाचे टीम येथे येतात मात्र आतापर्यंत एकाही चोराचा पत्ता न लागल्यामुळे पोलिसांवर आता संशय निर्माण होत आहे त्यामुळे गावकऱ्यांची आता पोलिसांवर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे यामध्ये काही वेगळच घडत नाही आहे ना असा प्रश्न आता संपूर्ण परिसरात दिसू लागला आहे यामध्ये आता वरिष्ठ अधिकारी लक्ष देतात का याकडे लक्ष लागले आहे
पुन्हा त्याच चोरांनी मारला मंदिरातील पेटिवय डल्ला
याच मंदिर परिसरात 27/ 4/ 2025 मध्ये चोरी झाली होती या चोरीच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये जे तीन चोर दिसत आहे ते चोर काल घडलेल्या चोरीच्या घटनेमध्ये सुद्धा चोरी करताना दिसत आहे मात्र पोलिसांना ते मिळत नाही
पोलिसांच्या सतर्कते मुळे मोठी घटना टळली
चोरीच्या मध्यरात्री रात्री एक ते दोनच्या दरम्यान चोर चोरी करत असताना त्याच वेळेत आपल्या रात्रीच्या गस्तीवर असताना बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, हेड कॉन्स्टेबल जंजाळ, यांनी त्या ठिकाणी रात्री चोरीच्या घटनेच्या वेळेस तेथे एन्ट्री झाल्यामुळे चोर भयभीत होऊन पडाले त्यामुळे चोरांनी तिसरी पेटी फोडने राहू देऊन चोर तिथून पळ काढला त्यामुळे पुढील घटना टळली
या घटने संदर्भात सखोल चौकशी होऊन आतापर्यंत जेवढे चोऱ्या झाल्या त्या सर्व घटना एकत्र करून हा तपास सीआयडी कडे देण्यात यावा अशी कुरणखेड येथील स्थानिक नागरिकांची मागणी सध्या दिसून येत आहे
बातमी – योगेश विजयकर
7030086770

