विधानसभेच्या निवडणुकीत भाजपशी बंडखोरी करून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेऊन लढलेले हरीश अलिमचंदानी यांनी अखेर भाजप मध्ये घर वापसी केली आहे.. अलिमचंदानी यांचं बंड शमविण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागली.. महापालिका निवडणूक जाहीर होताच हरीश अलिमचंदानी यांनी तिसऱ्या आघाडीची तयारी केली होती.. त्यांनी भाजप विरोधात बंडाचा झेंडा फडकवला होता..
मात्र वरिष्ठ पातळीवरील हालचाली पाहता.. भाजपसमोर बंडखोरांचे मोठे आव्हान उभे ठाकले होते.. बंडखोरांना अखेर भाजपकडून शांत करण्यात आले आहे.. आज भाजप कार्यालयात झालेल्या एका सोहळ्यात अलिकचंदानी यांनी अखेर भाजपची वाट धरत भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केल्याने भाजपची खेळी यशस्वी झाल्याची चर्चा अकोल्याच्या राजकारणात रंगली आहे..

