पातूर परिसरात 18 ते 20 वीस वर्षीय युवतीचा आढळला संशयित मृतदेह

पातूर परिसरात 18 ते 20 वीस वर्षीय युवतीचा आढळला संशयित मृतदेह

युवतीचे हात पाय बांधून काटेरी झुडपात फेकल्याची घडली दुर्दैवी घटना

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा29 जुलै 2023 अकोला जिल्ह्यातील पातुर परिसरात एका अठरा ते वीस वर्षाच्या युवतीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली हा मृतदेह युतीचे हातपाय बांधलेल्या परिस्थितीत असल्याने घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पातूर येथील सुमित्राबाई अंधारे कृषी विद्यालया जवळील शेत शिवारात जाणाऱ्या पांदण रस्त्यालगत असलेल्या एका काटेरी झुडपात एक बेवारस मृतदेह येथील गावकऱ्यांना दिसला काटेरी झुडपात हातपाय बांधलेल्या परिस्थितीत हा मृतदेह असल्याने याची माहिती तात्काळ पातुर पोलीस यांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता येथील हातपाय बांधलेल्या अवस्थेत असलेला हा मृददेह एका अठरा ते वीस वर्षीय वयाच्या मुलीचा असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी सदर बाप त्वरित आपल्या वरिष्ठांना सांगून तपास सुरू केला आहे घटनास्थळी पातुर पोलीस ठसे तज्ञ फॉरेन्सिक लॅब चे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे सदर युतीचे हात पाय बांधून असल्याने या युतीचा घातपात झाला असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असून नेमकी ही युती कोण? या युतीचा घातपात झाला की अजून काही प्रकार या युती सोबत घडला आहे याचा निष्कर्ष पोलिसांच्या तपासात निघेल पुढील तपास पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनात होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news