शाळेला दैवत मानणारे खापरे सर कुटासा शाळेच्या इतिहासातील एकमेव मुख्याध्यापक-कपील ढोके

शाळेला दैवत मानणारे खापरे सर कुटासा शाळेच्या इतिहासातील एकमेव मुख्याध्यापक-कपील ढोके

५८वर्षपूर्ती निमित्त केले ५८ वृक्षारोपण लेझीमच्या गजरात काढली कृतज्ञता फेरी या प्रसंगी उपस्थितांचे आले कंठ दाटून

अकोट प्रतिनिधी

पंचायत समिती,शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत कार्यालय कुटासा, अंगणवाडी सेविका तथा मदतनीस, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, उर्दू शिक्षक संघटना, प्रहार शिक्षक संघटना ,जुनी पेन्शन हक्क संघटना ,सेवानिवृत्त शिक्षक संघटना यांच्यावतीने सरांचा सत्कार करण्यात आला.जिल्हा परिषद शाळा कुटासा येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक विश्वास अजाबराव खापरे हे दि. ३१जुलै २०२३ ला सेवानिवृत्त झाले. त्या कारणाने शाळा व्यवस्थापन समिती शाळेतील शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका/मदतनीस यांच्या वतीने सप्तनिक त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते .सदर निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुटासा पंचायत समितीच्या सदस्या सपना ईश्वरदास झास्कर, उद्घाटक गावचे सरपंच अनंत लाखे तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते कपिलभाऊ ढोके, गटशिक्षणाधिकारी गजानन सावरकर, विस्तार अधिकारी अनंत नहाटे,सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोके शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिचंद्र गायकवाड गावचे पोलीस पाटील गजानन उगले, पत्रकार निरंजन गावंडे,उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अझरोद्दीन,शिक्षक परिषद अकोटचे तालुका अध्यक्ष विष्णू झामरे, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र थारकर, देशमुख,अतकरे काका, गजानन थोरात उपस्थित होते.जिल्हा परिषद शाळा कुटासा येथे आपल्या १३ महिन्याच्या कार्यकाळात दीड लाख लोकवर्गणी करून शाळेचे अंतरंग व बाह्यरंग सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणा-या खापरे सरांचा सप्तनिक निरोप समारंभ शाळेच्या आवारात संपन्न झाला. सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समिती विद्यार्थी व पालक यांनी लेझीमच्या गजरात सरांची व त्यांच्या अर्धांगिनी सौ.मायाताई खापरे शिक्षिका जिल्हा परिषद शाळा,शिवपूर गावातून मिरवणूक काढली त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये झालेल्या कार्यक्रमात सरपंच अनंत लाखे व ग्रामविकास अधिकारी फुलारी यांनी सरांचा सत्कार केला त्यानंतर शाळेच्या आवारात गावातील विविध मान्यवरांच्या हस्ते शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी सेविका व मदतनीस, पालक यांनी सरांना भेटवस्तू व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

५८ वृक्षारोपण

शाळेच्या आवारात १३ वृक्षारोपण करून पहिलीत दाखल ४५विद्यार्थ्यांना वृक्षवाटप करून सरांच्या ५८वर्षपूर्ती निमित्ताने ५८ वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला.या उपक्रमाच्या माध्यमातून सरांच्या शाळेतील सेवाकाळातील स्मृती जतन करण्याचा प्रयत्न शाळेच्या वतीने करण्यात आला.
याप्रसंगी उमेश थोटे या गोपाल अतकरे ,शलाकाताई चौकणे, रंजनाताई गावंडे,अनुराधा सपकाळ, ज्योती शर्मा,सुनिता घाटोळे बाजोड, अनिता कलाने, रामराव गावंडे ,अरुण थोरात यांनी सरांना शाल, श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कारित केले.तसेच सरांची सुकन्या डॉ.वृषाली राठोड व जावई स्वप्निल राठोड यांचे स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाची संचलन अमर भागवत, प्रास्ताविक देवेंद्र फोकमारे तर आभार प्रदर्शन नरेश धुमाळे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका कु. वंदना पांडे, कु.अर्चना ढवळे शाळेचे शिक्षक समाधान निवाने तथा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news