उड्डाणपुलाच्या भ्रष्टाचार करण्यावर अकोलेकरांच्या जिवावर उठणा-यांवर तात्काळ कारवाई करा!

उड्डाणपुलाच्या भ्रष्टाचार करण्यावर अकोलेकरांच्या जिवावर उठणा-यांवर तात्काळ कारवाई करा!
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

अकोला शहरातील गाजावाजा करीत नवीन उड्डाणपुलाची निर्मिती केली त्या उड्डाणपुला अशोक वाटिका चौकातील उड्डाणपुल भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून अकोला शहरात २८ मे २०२३ रोजी बांधून एक वर्ष पूर्ण झाले. मात्र गत ११ महिने पुलावरुन मुर्तिजापूरकडे जाणारा मार्ग (लॅडीग) बंद होते. पुल सुरू झाल्यानंतर ६ महिन्यातच या उड्डाणपुलाखाली मोठी पाईपलाईन फुटल्याने ती पाईपलाईन दुरुस्त करतांना पुलाला क्षती पोहोचली, पुल धोकादायक बनला. त्यानंतर गेल्या ६ महिन्यांपासून या पुलाचे दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू होते. पुलाची दुरुस्ती करतांना त्यामध्ये जुने तेलले ब्लॉक बसविण्यात आल्याचे | दिसून आले आहे. कंत्राटदारावा हा प्रताप अकोलेकरांच्या जिवावर उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशोक वाटीका चौकातील नादुरुस्त झालेल्या उड्डाणपुलाची थातुरमातुर दुरुस्ती करून ते वाहतुकीसाठी खुला करून, श्रेय लाटण्याच्या व्यासापोटी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी मागील आठवड्यात उड्डाणपुलाचे पुजन करून रस्ता खुला केल्याचा आनंद व्यक्त केला होता. या पुलामध्ये एवढा भ्रष्टाचार झालेला आहे की तो, सामान्य जनतेला दिसतो आहे. पण प्रशासनाला दिसत नाही आहे. प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांचेकडून अभिनव आंदोलन करून तुटलेल्या प्लेट्सवर क्रमांक लिहित चोक्याचे चित्रही रेखाटले आहेत. तुटलेले ब्लॉक कधीही पडून पुल खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात इथे काही अप्रिय घटना घडू शकते. त्यामुळेच शिवसेनेच्या वतीने वारंवार आंदोलन करून समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधत आहे. पण झोपेचे सोंग घेणा-या सरकारला जागे करण्याकरिता आम्ही यापुढे उग्र आदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आपण स्वतः जातीने लक्ष घालून संबंधितांवर योग्य व तात्काळ कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन आज उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news