मा. पालक मंत्री ह्यांच्या हस्ते अक्षय टेंभूर्णीकर यांचा विशेष सन्मान..

मा. पालक मंत्री ह्यांच्या हस्ते अक्षय टेंभूर्णीकर यांचा विशेष सन्मान..

67 वी राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा दी. 23 ते 29 डीसें 23 दरम्यान स्व. वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे शालेय भारतीय खेळ महासंघ अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे महा. राज्य तसेच अकोला जिल्हा क्रीडा परिषद, अकोला व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या वतीने 14 वर्ष, 17 वर्ष आणि 19 वर्षातील मुलांच्या विविध वजन गटात राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झाल्यात. ह्या स्पर्धेत संपूर्ण भारतातून एकूण 34 राज्य तसेच केंद्र शासित प्रदेशा चे खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तसेच स्पर्धा पार पाडण्यास भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अधिकृत पंच/निर्णायक ह्यांनी सुद्धा आपली उत्तम कामगिरी बजावली, दरम्यान स्पर्धा यशस्वी करण्यास पातूर येथील अक्षय टेंभूर्णीकर ह्यांची बी. एफ. आय. तसेच शालेय भारतीय खेळ महासंघ तर्फे स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती.. ही पातूर साठी फार अभिमानास्पद बाब आहे. ह्या आधी अक्षय ने खूप राष्ट्रीय स्पर्धेचे तांत्रिक आधिकरी पद उत्कृष्टरित्या हाताळलेले आहे. ह्या स्पर्धेमध्ये सुद्धा तांत्रिक अधिकारी (TO) ची जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळून स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न करण्यात अक्षयच मोलाचं योगदान आहे.. त्याने केलेल्या कार्याचा उल्लेख म्हणून स्पर्धेच्या समारोप प्रसंगी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे आय, तसेच पशू व दुग्ध विकास मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील ह्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी मंचकावर मा. आ. हरीश दादा पिंपळे, मा. आ. वसंतदादा खंडेलवाल, मा. आ. अमोल दादा मिटकरी, मा. आ. प्रकशजी भारसाकळे, जिल्हाधिकारी मा. अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. बी. वैष्णवी, जिल्हा पोलिस अधीक्षक. मा. संदीप घुगे, स्पर्धेसाठी आलेले शालेय भारतीय खेळ महासंघाचे पर्यवेक्षक मा. हिमांशू शुक्ला(लखनऊ) व जिल्हा क्रीडा अधिकारी, श्री सतीशचंद्र भट्ट, आदी. मान्यवर उपस्थित होते. पातूर सारख्या एका छोट्याश्या गावातून तसेच तालुक्यातून अक्षय टेंभूर्णीकर हा एकमेव पहिला राष्ट्रीय पंच/तांत्रिक अधिकारी तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक सुद्धा आहे व त्याच्या प्रशिक्षणामध्ये अनेक राज्य व राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू बनवले आहेत. हे वाखाण्याजोग आहे…
व मा. पालकमंत्री महोदय ह्यांच्या हस्ते अशा प्रकारचं सन्मान होण ते ही शासकीय राष्ट्रीय स्पर्धेत हे पतुरच्या क्रीडा इतिहासात पहिल्यांदाच घडलेलं दिसत आहे.. ह्यामुळे अक्षय च पंचक्रोशीत कौतुक होत आहे.. व ह्याचे श्रेय तो जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. सतीशचंद्र भट्ट, श्री. प्रमोद सुरवाडे, व आपली आई ह्यांना देतो..

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news