मनपा व्‍दारे नेहरू पार्क, मजीप्रा कार्यालय तसेच आर डी जी कॉलेज लगतच्‍या तसेच  अतिक्रमणावर अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबविण्‍यात आली.

मनपा व्‍दारे नेहरू पार्क, मजीप्रा कार्यालय तसेच आर डी जी कॉलेज लगतच्‍या तसेच  अतिक्रमणावर अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबविण्‍यात आली.

अकोला दि. 5 जानेवारी 2024 – अकोला महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये आज दि. 5 जानेवारी 2024 रोजी नेहरू पार्क चौकातील, मजीप्रा कार्यालय लगतचे तसेच आर डी जी कॉलेज जवळील वाहतुकीस अडचण निर्माण करणा-या अतिक्रमणावर मनपा अतिक्रमण विभागाव्‍दारे अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवून रस्‍ता मोकळा करण्‍यात आला आहे.

            या कारवाईत अतिक्रमण विभागाचे सहा.अतिक्रमण अधिकारी प्रविण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, अतिक्रमण विभागातील कर्मचारी व सुरक्षा रक्षकांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news