पो.स्टे जुने शहर अकोला येथील महीलेची फसवनुक करणारे ०२ आरोपी स्थानिक गुन्हे शाखेची आणखी आणखी एक मोठी कारवाई ४८ तासात वर्धा येथून आरोपींना अटक!

पो.स्टे जुने शहर अकोला येथील महीलेची फसवनुक करणारे ०२ आरोपी स्थानिक गुन्हे शाखेची आणखी आणखी एक मोठी कारवाई ४८ तासात वर्धा येथून आरोपींना अटक!

दिनांक १७ जानेवारी २४ रोजी फिर्यादी नामे श्रीमती मायाबाई राजु खुळे वय ३४ वर्ष रा. गाडगे नगर, अकोला यांच्या तक्रारीवरून किल्ला चौका कडुन घरी जात असता, अनोळखी ईसम त्याचे जवळ येवून म्हणाले की, तुम्ही माझे आई सारख्या आहात पोळा चौकाकडे साड्या वाटप करीत आहे. तुम्ही माझे सोबत चला असे म्हटल्याने मी त्याचे सोबत गेली असता काल भैरव मंदीराजवळ गल्लीमध्ये त्यांनी गळ्यातील सोन्याचे दागिणे काढायाला सांगितले, गळयातील दागिने काढून पॉकेट मध्ये ठेवली आणि पॉकेट मधील नगदी ३०००/-रू व सोन्याची मनी असा एकुण ८०००/-रूचा माल दोन अनोळखी ईसम घेवून गेले अश्या फिर्यादीचे जबाणी तक्रारवरून पो. स्टे जुने शहर अकोला येथे अपराध कमाक ८०/२४ कलम ४२०,३४ भा.दं.वि चा नोंद असून तपासावर आहे. सदर घटनेने महिला वर्गात भिती निर्माण झाली होती.
त्याची पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी यांना निष्पन्न करण्याबाबत पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी आदेशीत केले असता, स्थानीक गुन्हे शाखा प्रमुख यांनी एक पथत गठीत करून त्यांना मिळालेली गोपनिय माहीतीदार यांचे मार्गदर्शन करून सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी निष्पन्न करण्याबाबत आदेशीत केले असता, पथकाने गोपनिय यंत्रना अमलात आणून सदर गुन्हयातील आरोपी नामे १) सुरज मिश्रीलाल कंजरभाट वय ३६ वर्ष रा. ईतवारा बाजार पोलीस चौकी समोर वर्धा २) सुनिल ईश्वर नेतलेकर वय ४३ वर्ष रा. ईतवारा बाजार, कंजर मोहल्ला पोलीस चौकी समोर वर्धा यांनी सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न करून, त्यांना वर्धा येथून ताब्यात घेवून त्यांचे कडून गुन्ह्यातील वाहन हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले. तसेच वर नमुद आरोपीतांना सखोल विचापूस केली असता सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी मागिल ०५ वर्षा पासून अकोला जिल्ह्यात व इतर जिल्हयात अश्या प्रकारे बतावणी करून फसवणूकीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये त्यांनी अकोला जिल्हयात केलेल्या गुन्हयाचे अभिलेखावर पाहणी केली असता पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला येथील अप नं ४८४/२२ कलम ४२० भादंवि आणि पो.स्टे जुने शहर अप.नं ३९१/२२ कलम ४२०,३४ भादंवि, पोस्टे बाभुळगाव जि. यवतमाळ अप नं ५८०/२२ कलम ४२०,३४ भादंवि अश्या प्रकारचे दाखल असून त्यांनी सदर गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीतांची टोळी ही पोलीसांनी पहिल्यांदाच उजेडात आणली आहे. स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकाने सदर गुन्हा घडल्यानंतर गोपनिय बाबतमीदाराकडून सदर गुन्हा उघड आणून आंतरजिल्हा गुन्हे करणा-या टोळीस जेरबंद करण्यात यश मिळविले असून आरोपीतांना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन जुने शहर यांचे ताब्यात दिले आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अकोला बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब, पो.नि. शंकर शेळके, यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास डी. भगत, पोउपनि. गोपाल जाधव, अमंलदार रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र गलिये, अविनाश पाचपोर, वसीमोद्दीन शेख, एजाज अहेमद, विशाल मोरे, भिमराव दिपके, यांनी केली असून स्थानीक गुन्हे शाखा वर्धा यांचे सहकार्य लाभले.तरी पोलीस विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे की, सद्या मकरसकांती निमीत्याने महिला वर्ग हळदी कंकूच्या कार्यक्रमासाठी किमती आभूषने / दागिने परिधान करून जाण्याची प्रथा आहे. त्या साठी पोलीसांकडून दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news