आयुक्तांच्या बदली चा मनपात जल्लोष..!

आयुक्तांच्या बदली चा मनपात जल्लोष..!
फटाके फोडून केली अधिकाऱ्यांनीओली पार्टी..?

अकोला :- महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांच्या बदलीचा आदेश मनपात धडकताच अधिकार्यांनी फटाके फोडत आपला आनंद व्यक्त करत फटाके फोडल्याने इतर कर्मचारीनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. मनपा आयुक्त ह्या बे शिस्त अधिकाऱ्यांना शिस्त लावण्याकरिता रोज या बेशीस्त अधिकाऱ्यांची शाळा घ्यायच्या त्यामुळे बऱ्याच अधिकाऱ्यांना घाम फुटत असे तसेच बऱ्याच अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले होते. त्यामुळे बरेच अधिकारी आयुक्तांविषयी हे अधिकारी नाराजी व्यक्त करत होते.

विशेष म्हणजे
सप्टेंबर 2021 मध्ये आयुक्त पदाचा पदभार संभाळल्यावर सेवानिवृत्त कर्मच्यार्याच्या थकित असलेल्या देणी वर भर देऊन आपल्या कौशल्याचे प्रत्यय आणत सहा सहा महिने कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिण्याच्या एक तारखेला करत असल्यामुळें कर्मचारी खुश होते. तसेच रेंगाळलेला सातव्या वेतन आयोगाची फाईल शासनाकडून मंजूर करुन वेतन आयोग लावला.सतत पाठपुरावा करत मनपाचा आकृतीबंध मंजूर करण्यासाठी महत्वाची भुमिका अदा करुनही विभाग प्रमुखांना वठणीवर आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करत मोठमोठे प्रोजेक्ट आणले.त्यांच्या कार्यकाळात भोड प्रकल्प, अमृत योजना 2, वाहन विभागाला नविन काम्प्रेसर,जेसिबी,ट्रक्टर, कचरा घंटा गाडी,अनेक कार्य पहावयास मिळाले परंतु भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी यांची दाळ शिजवू न दिल्याने अधिकारी वर्गात कमालीची अस्वस्थ होती.अधिकार्यांनी आयुक्तांच्या बदली साठी देव पाण्यात बूडवुन ठेवले होते. देवाला नवस केला असल्याची चर्च आता रंगु लागली आहे. आयुक्तांच्या बदलीच्या आदेश आल्याने गौरक्षण रोडवरील एका बार मध्ये ओली पार्टी सुद्धा झाली विषेश म्हणजे अतिविश्वासु असलेला ही या पार्टीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. असल्याने ते कोण अधिकारी आहेत याबाबत मनपा वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.

ज्या आयुक्तांनी शहरासाच्या विकासासाठी महिला असुनही भरपूर प्रयत्न केले अश्या आयुक्तांच्या बदली झाल्याने अधिकार्यांनी फटाके फोडणे म्हणजे गरज सरो वैद्य मरो अश्या म्हणीप्रमाणे आनंद साजरा केला हे अकोला शहरासाठी मोठे दुर्भाग्य म्हणावे लागेल.

मात्र इतर कर्मचारी आयुक्तांच्या बदलीने आपली नाराजी व्यक्त करत आहेत.. शासनाने निदान लोकसभेची निवडणूक होईपर्यंत तरी आयुक्तांची बदली थांबवावी अशी मागणी होत आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता बदलीचा आदेश जरी निघाला असेल मात्र येणाऱ्या आयुक्तांची नावे अजुनही शासनाने प्रसिद्ध न केल्याने मला बाई त्यांची बदली रद्द होणार असल्याची चर्चा सध्या मनपा वर्तुळात सुरु आहे.
तर दुसरीकडे मनपा आयुक्तांची बदली होताच मनपातील अधिकारी हम नही सुधरेंगेच्या भूमिकेवर ठाब आहेत. अशी चर्चा चर्चा मनपा वर्तुळात होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news