अकोल्यात महापालिका सत्तेवरून चांगलच राजकारण तापलं आहे. भाजपला डीवचण्यासाठी अकोल्यात अनोखे बॅनर लागलं असल्याची चर्चा आहे..बॅनर वर ‘‘झुकणार नाही, वाकणार नाही’’ झुकले भी वाकले भी आता झोपायची वेळ आली, आता काय झुकायचं वाकायचं राहलं? अशा स्वरुपाचे फलक अकोल्यातील प्रभाग क्र. 5 मध्ये लावण्यात आले आहे.. नेमके हे फलक कुणी व का लावले याबाबत स्पष्टता असून मात्र हे बॅनर अकोला भाजपला डिवचण्यासाठी लावण्यात आल्याची चर्चा अकोल्यात रंगली आहे.. अकोला महापालिकेत भाजपने सत्तेचे गणितं जुळविली असून भाजपच्या 38 नगरसेवकांसह 44 जणांचा गट आज स्थापन करण्यात आला आहे. या गटात इतर पक्षांतील चार मुस्लिम नगरसेवक असून याच कारणावरून हे फलक लावण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.. हे फलक अकोला भाजपाचा निषेध म्हणून लावण्यात आल्याची चर्चा आहे, सध्या हा शहरामध्ये चर्चेचा विषय बनला आहे…
