कृषीदुतांनी दिली शेतकऱ्यांना बोर्डो मिश्रणाबाबत माहिती

कृषीदुतांनी दिली शेतकऱ्यांना बोर्डो मिश्रणाबाबत माहिती

बाभूळगाव : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विध्यापीठ अंतर्गत श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिरला अंधारे येथील विध्यार्थ्यांनी शेतकर्‍यांना बोर्डो मिश्रणाबाबत माहिती दिली , तसेच बोर्डो मिश्रण तयार करण्याची योग्य प्रक्रिया त्यांना प्रात्यक्षिकासह समजावून सांगितली . यावेळी शेतकर्‍यांची शंका तेथे उपस्थित विध्यार्थ्यांनी दूर केल्या . व ते कश्या पद्थीतीने व किती प्रमाणात वापरावे याबद्दल कृषी महाविध्यालयाचे विध्यार्थी कुलदीप गव्हाले, अभय गवळी, अभीषेक गावंडे, आचल गावंडे, गायत्री गावंडे यांनी शेतकर्‍यांना माहिती दिली. यावेळी गावातील शेतकर्‍यांची प्रामुख्याने उपस्थिती होती . या उपक्रमासाठी श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. राम खर्डे, कार्यक्रम समन्वयक शिवकुमार राठोड़, कार्यक्रम अधिकारी प्रा . सागर भगत, विषयतज्ञ प्रा. सागर भगत यांचे मार्गदर्शन लाभले .

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news