मनपा प्रशासनाव्‍दारे खुले नाट्य गृहाच्‍या मैदानात तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात दिवाळी मार्केटची व्‍यवस्‍था

मनपा प्रशासनाव्‍दारे खुले नाट्य गृहाच्‍या मैदानात तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात दिवाळी मार्केटची व्‍यवस्‍था

मनपा आयुक्‍त यांच्‍या दालनात दिवाळी सणा निमित्‍त किरकोळ व्‍यावसायिकांची नियोजन बैठक संपन्‍न.

अकोला दि. 31 ऑक्‍टोंबर 2023 – आज दि. 31 ऑक्‍टोंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या व्‍दारे त्‍यांच्‍या दालनात दिवाळी सणा निमित्‍त शहरातील मुख्‍य बाजार पेठ येथील मुख्‍य रस्‍त्‍यांवर लावण्‍यात येणा-या किरकोळ व्‍यावसायिकांची ए.पी.आय पडघन, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप‍ निरीक्षक गणेश चोपडे, सिटी कोतवाली पोलीस स्‍टेशनचे पोलीस कर्मचारी आशिष सुगंधी यांच्‍या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्‍न झाली आहे.

दिवाळी सणा निमित्‍त अकोला महानगरपालिका क्षेत्रातील मुख्‍य रस्‍त्‍यावर शहरातील आणि ग्रामीण भागातून मुर्ती, फुल, हार, झाडू, पणती, मातीचे खेळणे, प्रसाद व पुजा सामग्रीची किरकोळ विक्रेत्‍यांव्‍दारे दुकाने लावण्‍यात येत असतात. त्‍यामुळे गांधी रोड, जैन मंदीर रोड, फतेह अली रोड व मुख्‍य बाजार पेठेतील मुख्‍य रस्‍त्‍यांवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची होत असलेली कोंडी लक्षात घेता तसेच शहरातील नागरिकांना आणि व्‍यावसायिकांना अधिक सोईचे व्‍हावे याकरिता मनपा प्रशासनाव्‍दारे खुले नाट्य गृहाच्‍या मैदानात तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात दिवाळी मार्केटची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. या ठिकाणी प्रशानाव्‍दारा पॅव्‍हर्स ब्‍लॉक लावून रस्‍ते तयार करण्‍यात येत आहे, नारिकांना दुकाने लावण्‍यासाठी संपुर्ण परिसरात चुरी टाकण्‍यात येत आहे, पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था, सुरक्षेच्‍या दृष्‍टीने सी.सी.टी.व्‍ही.कॅमेरे, पथदीप व्‍यवस्‍‍था, मोबाईल टॉयलेट व्‍हॅन, स्‍वच्‍छतेसाठी सफाई कर्मचारी आदि प्रकारच्‍या सुविधा देण्‍यात येत असल्‍याबाबत मनपा आयुक्‍त तथा प्रशासक यांनी यावेळी माहिती दिली आहे.

यावेळी क्षेत्रीय कार्यालयाचे सहा.आयुक्‍त विजय पारतवार, विठ्ठल देवकते, देविदास निकाळजे, सहा.अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, बाजार अधिक्षक राजेश सोनाग्रे, बांधकाम विभागाचे उप अभियंता कृष्‍णा वाडेकर, गौरव श्रीवास यांचेसह लघु व्‍यावसायिकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news