२२ जुलैच्या अतिवृष्टी मदतीच्या यादित मर्जीतील लाभार्थी.

२२ जुलैच्या अतिवृष्टी मदतीच्या यादित मर्जीतील लाभार्थी.
नुकसानग्रस्त, खरे-शेतकरी मदतीपासून वंचित.प्रशांत डिक्कर.!

संग्रामपूर/ २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने संग्रामपूर जळगाव जा.तालुक्यातील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन खरडून गेली होती. शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले,शेकडो जणावरे पुरात वाहुन गेलेत, शेतातील विहिरी पुर्णपणे खचुन गेल्यात, शेकडो घरे व दुकानात पुराचे पाणी शिरले असल्याने प्रचंड प्रमाणात नासधुस होऊन पुर्णपणे नस्तानाभुत झाले आहेत. नुकसान होऊन कितीतरी महिने उलटले तरी सुद्धा लाभार्थी मदतीची प्रतीक्षा करीत आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडुन गेल्या त्या जमिनी ४/५ वर्षं पिकत नाहीत. त्यामुळे त्या जमिनीवर बँकचे घेतलेले पिक कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांकडे कोणताही पर्याय नाही. खरडुन गेलेल्या जमीनीवरचे सरकारने कर्ज माफ करणे अपेक्षित होते. पंरतु सत्ताधाऱ्यांनी कर्ज माफिसाठी खंमग विरोध करीत शेतकऱ्यांनी कर्जमाफी साठी केलेले आंदोलन दडपून जिल्हा प्रशासनाची बैठक रद्द करण्यासाठी प्रतीष्टा केली. व त्यावेळी पत्रकार परिषदा घेऊन सर्व शेतकऱ्यांना मदत मिळेल असा संभ्रम निर्माण केला. जणतेच्या समाधानी साठी पंचनामेही करण्यात आले. पंरतु आता मदत देते वेळी ज्यांचे नुकसान नाही अशा मर्जीतील लोकांचे नावे लाखो रुपयांच्या यादित आले आहेत. ज्यांचे खरे नुकसान झाले त्यातील काहींना तुटपुंजी मदत व हजारो नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहण्याचे चिन्ह आहेत. संग्रामपूर, जळगाव मधील अधिकारी व काही कर्मचाऱ्यांवर सत्ताधारी किड्यांचा दबाव असल्याने हा प्रकार घडला आहे. या गौडबंगाल प्रकरणी अडचणीत सापडलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. सत्ताधारी मंडळी तहसिल कार्यालयात हजेरी देत अधिकाऱ्यांची पाठराखण करीत आहेत. पंरतु नुकसानग्रस्तांना मीळत असलेली तुटपुंजी मदत. नुकसान होऊनही मदतीपासून वंचित असलेले. व खरडुन गेलेल्या जमीनीवरच्या पिक कर्ज माफ होणार कि शेतकऱ्यांना पर्यायाने आत्महत्या कराव्या लागतील असा प्रश्न स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी महसुल अधिकाऱ्यांनसमोर उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news