स्व डँडी देशमुख स्मृती “लघु चित्रपट महोत्सवात” अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जेदार लघु चित्रपटांची मेजवानी.

स्व डँडी देशमुख स्मृती “लघु चित्रपट महोत्सवात” अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जेदार लघु चित्रपटांची मेजवानी.
==========================
सहाव्या लघुचित्रपट महोत्सवाचे अकोला येथे शानदार आयोजन.
=======================
अकोला : स्व डँडी देशमुख जयंतीनिमित्त लघुचिञपट महोत्सव समितीच्या वतीने दोन दिवशीय लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.दि २६ व २७ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित या महोत्सवात अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांच्या लघुचिञपटांची मेजवानी अकोलेकर रसीकांना लाभणार असल्याची माहीती आयोजन समितीचे सर्वश्री प्रा तुकाराम बिडकर, डॉ संजय खडक्कार, प्रशांत देशमुख, प्रा सदाशिव शेळके, डॉ राजेश देशमुख, पंकज देशमुख,कुणाल देशमुख यांनी आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.
विदर्भाच्या कलाक्षेत्रात अष्टपैलु कर्तुत्व गाजवीणारे विदर्भाचे चित्रपटमहर्षी स्व डँडी देशमुख ह्यांचे जयंती प्रित्यर्थ ६ व्या लघुचित्रपट महोत्सवाचे उद्घाटन दि २६ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता मा संदिप घुगे पोलीस अधिक्षक,अकोला ह्यांचे अध्यक्षतेखाली तर मा अजीतजी कुंभार जिल्हाधिकारी अकोला यांचे शुभ हस्ते हाॅटेल सेंटर प्लाझा अकोला येथे संपन्न होईल. सदर कार्यक्रमात सहभागी झालेल्या ७५० भारतीय व १४५० आंतरराष्ट्रीय लघुचित्रपटापैकी निवडक फिल्म प्रदर्शीत करण्यात येतील, याकरिता प्रवेश विनामूल्य असेल.
लघुचित्रपट महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी दि २७ डिसेंबर २०२३ रोज बुधवार ला स्थानिक प्रमिलाताई ओक सभागृह अकोला येथे दुपारी ४ वाजता संपन्न होणाऱ्या समारोप व बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थानी अकोला पुर्व चे आमदार मा रणधीर सावरकर राहणार आहेत तर विषेश अतिथी चित्रपट अभिनेते संदिप कुलकर्णी (सत्यशोधक फेम)असतील यावेळी माजी आमदार गजानन दाळु गुरुजी व सुप्रसिद्ध चित्रपट “निशानी डावा अंगठा” चे कथाकार व लेखक रमेश इंगळे यांची प्रमुख उपस्थिती राहील.सदर कार्यक्रमात लहान वयात भरीव कामगीरी करणारे बालकलाकार स्वराज सोसे ( बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा फेम ) व श्रृती भांडे ( स्टार प्रवाह वरील सुपरस्टार छोटे वस्ताद उपविजेती गायीका ) यांना सन्मानीत करण्यात येईल.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये व सिनेदिग्दर्शक समीर आठल्ये यांनी आयुष्यभर उत्कृष्ट कला प्रदर्शन करुन मराठी चित्रपट सृष्टीत आपली वेगळी छाप निर्माण करणाऱ्या दाम्पत्यास “स्व डँडी देशमुख जीवन गौरव पुरस्काराने” सन्मानीत करण्यात येईल.
त्यानंतर विविध भाषेतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरुन प्राप्त उत्कृष्ट लघुचित्रपटांमधुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 20 निवडक लघुचित्रपट प्रदर्शीत करण्यात येतील.सदर चित्रपटांचे परिक्षण सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री व दिग्दर्शीका वैशाली केंदळे, सिनेदिग्दर्शक संजय शर्मा,शाहीद कबीर,निलेश जळमकार, डॉ राजेश देशमुख करणार आहेत.
कार्यक्रमात स्पर्धेत पात्र ठरलेल्या अनुक्रमे ३ लघुचित्रपटांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.सदर लघुचित्रपट महोत्सवात विनामूल्य प्रवेश असून याचा लाभ अकोलेकर चित्रपट रसीकांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहनही यावेळी स्व डँडी देशमुख स्मृती लघु चित्रपट महोत्सव आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले.संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेस सर्वश्री प्रा श्रीराम पालकर, डॉ प्रभाकर मोहे,प्रा अशोक भराड अनिल मालगे, संजय तायडे ह्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news