अकोला मनपात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर अन्याय?

अकोला मनपात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर अन्याय?

हयात असल्याचा फार्म भरल्यावरही पेन्शन दिल्या जात नाही?

अकोला :- मनपात प्रशासक राज असतानाअकोला शहरात मोठ्याप्रमाणात विकास होतील अशी सर्वसामान्य नागरिकांना आशा होती परंतु तसे होतांना दिसत नाही.विकास तर सोडा मनपात सेवा करुनही आपल्या हक्काची पेन्शन ही वेळेवर होत नसल्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. वयाची साठी पार केल्यामुळे तसेच अन्य आजारामुळे हयातीचा फार्म भरण्यास उशीर झाला या कारणाने त्यांची पेन्शन माहे डिसेंबर पेड जानेवारी मध्ये न दिल्याने त्याच्यावर उपासमारीची पाळी आल्याने मनपात प्रशासक राज मुळे सेवानिवृत्त कर्मचारी वैतागले आहेत.हयातीचा फार्म भरल्यावरही पेन्शन विभाग प्रमुख आपली हेकडी दाखवत पुढील महिन्यात पेन्शन होणार असे मौखिक आदेश देऊन परत करत आहे वास्तविक पाहता पेन्शन रोखण्याचा अधिकार नाही आणी काही कारणास्तव रोखल्याही असतील तर कारण स्पष्ट झाल्याबरोबर देण्यास हरकत नाही परंतु पेन्शन विभाग मनपा प्रशासकाला ही जुमानत नसल्याचे यावरुन दिसत आहे. मागिल तिन वर्षात पेन्शन विभागातील देणी पुर्णपणे देण्यास तत्कालीन आयुक्त तथा विद्यमान आयुक्त तथा प्रशासक यांनी कुठलीही कमतरता ठेवली नाही मग पेन्शन विभागातील कर्मचाऱ्यांना सध्यास्थितीत जे कर्मचारी रीटायर होत आहे त्यांचेच काम असल्यामुळे तेपण सहा सहा महिने पेन्शन लावत नाहीत मग हे कर्मचारी करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिक माहिती घेतली असता बऱ्याच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची फाईल लेखाविभागात धुळ खात आहे. पैसे नसल्याचे कारण पुढे करून सतावत असल्याची माहिती मिळाली आहे. ज्यांनी गुरु दक्षिणा दिली त्यांची देणी लवकर काढण्यात आली असल्याचे कळते.याबाबत आयुक्तांनी सहनिशा केल्यास झालेला प्रकार लक्षात येईलच परंतु सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना काही उपसाधन नसल्यामुळें पेन्शन विभागाच्या गैरकारभारा मुळे नाहक त्रास होत असल्याने आयुक्त तथा प्रशासक यांनी लक्ष देऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा छळ थांबवावा अशी मागणी होत आहे. यावर आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी काय निर्णय घेतात याकडे सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news