कायदा रद्द केल्या जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. – जावेद खान पठाण

कायदा रद्द केल्या जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. – जावेद खान पठाण

ट्रक मालक चालक संघटनेने शिवानी विमानतळ जवळ केले रास्ता रोको आंदोलन

पोलिसांनी घेतलें ताब्यात, आणि केली सुटका

अकोला. ट्रक चालक-मालक संघटनेच्या वतीने 10 जानेवारीपासून पुन्हा हीट अँड रन कायद्याला विरोध करण्यासाठी संप सूरू करण्यात आला आहे. संपामध्ये काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केल्या जात आहे . आज शांततेच्या मार्गानेच शिवणी विमानतळ जवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. एम आय डी सी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन काहीं वेळाने सोडून देण्यात आले. यावेळी जोपर्यंत कायदा रद्द केल्या जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जावेद खान पठाण यांनी सांगीतले.

संघटनेच्या वतीने स्टेरिंग छोडो आंदोलन केले जात आहे . आणि वाशीम बायपास येथे सर्व आंदोलक गाड्यांचे स्टिअरिंग सोडुन एकत्र बसत आहेत. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही आणि हा कायदा रद्द केल्या जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल असा निर्धार आंदोलकांनी केला आहे.आज दुपारी 3 वाजे दरम्यान शिवणी विमानतळजवळ राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी संयुक्त वाहन संघटनेचे अध्यक्ष विनोद नालट, संघर्ष वाहन असोसिएशन चे प्रशांत मराठे ,अब्दुल आसिफ (उर्फ गुडडू सेठ ), वसीम, शे. मेहबूब, सुभाष तायडे, योगेश इंगळे, भगवान अहेर, गजानन अहिर, संदीप पाटील, राजू इंगळे, धनंजय आगरकर, ज्ञानेश्वर कवळकार आदींसह अनेकांची उपस्थीती आंदोलनात होती.अशी माहिती जावेद खान पठाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली

अकोला शहर जिल्हा युवक काँग्रेस मार्फत अकोला वाहन चालक कृती समितीला हिट अँड रन कायद्याच्या विरोधात जाहीर पाठींबा देण्यात आला या वेळी जिल्हा अध्यक्ष आकाश कवडे,उपाध्यक्ष राहुल सारवान,अंकुश तायडे, विध्यार्थी जिल्हाध्यक्ष चे अभिजीत तवर, युवा काँग्रेस पक्ष विधानसभा अध्यक्ष मो शारीक, लखन सेठ सारवान, जय गिऱ्हे, संतोष निधाने, संतोष झांझोटे,तेजस देवबाले, आधी युवकांचे पदाधिकारी उपस्थित होते

पुढील आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्ध नग्न आंदोलन

हिट अँड रन कायदा काळा कायदा असून तो कायदा त्वरीत वापस घ्यावा या मागणीसाठी सूरू असलेल्या आंदोलनात आता मोटार वाहन मालक चालक हे पुढील आंदोलन म्हणुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्ध नग्न आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती संयुक्त वाहन संघटनेचे अध्यक्ष विनोद नालट यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news