होली फेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल येथे क्रीडा क्रीडा सप्ताहाला सुरुवात

होली फेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल येथे क्रीडा क्रीडा सप्ताहाला सुरुवात

मनोज भगत
ग्रामीण प्रतिनीधी तेल्हारा

होली फेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल हिवरखेड येथे 18 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान स्वर्गवासी आबासाहेब खेडकर शिक्षण संस्थेद्वारा संचालित होली फेथ इंग्लिश प्रायमरी स्कूलचे अध्यक्ष माननीय जीवनरावजी देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी केंद्रप्रमुख मनीषजी गिऱ्हे सर होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन फीत कापून हिवरखेड नगरीच्या प्रथम नागरिक सरपंच सौ वैशालीताई वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख अतिथी म्हणून सतीश जी इंगळे जगन्नाथ महाकाळ देवेंद्रजी राऊत प्राध्यापक सागर ढाकरे सर प्राध्यापक निखिल भड सर यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून माता सरस्वतीचे व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. कल्पना अस्वार मॅडम यांनी केले तर संचालन शितल रेखाते मॅडम यांनी केले तसेच उद्घाटक म्हणून लाभलेले सरपंच सौ वैशालीताई वानखडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगून मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या तसेच भड सर ठाकरे सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मनिष गिऱ्हे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मैदानी खेळाचे महत्व पटवून दिले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या त्यानंतर क्रीडा स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. संपूर्ण दिवसात एक ते चार वर्गाच्या धावण्याची शर्यत व तीन पायाची शर्यत असे दोन खेळ घेण्यात आले. स्पर्धेचे निरीक्षक सौ.सोनू कुऱ्हाडे मॅडम व सौ शितल शेळके मॅडम होत्या तर आभार शितल वानखडे मॅडम यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिया वालचाळे मॅडम ममता इंगळे मॅडम पल्लवी फोपसे मॅडम शीतल अग्रवाल मॅडम सीमा सोनवणे मॅडम कुमुदिनीताई डेंगेकर प्रतिभा वाईकर राजाराम भाऊ इंगळे मनीष ताळे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news