उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल शिक्षक गणेश वाझुळकर यांचा सत्कार

उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल शिक्षक गणेश वाझुळकर यांचा सत्कार

मालेगाव@सोयल पठाण

जिजामाता माध्यमिक विद्यालय पांगरी नवघरे येथे कार्यरत असलेले इंग्रजी विषयाचे शिक्षक गणेश वाझुळकर यांचा प्रजासत्ताक दिनी गावकऱ्यांच्या वतीने पालक दशरथ विढोळे यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी श्री व्यंकटेश सेवा समिती संचालक रामभाऊ जाधव,अंजिक्यभाऊ जाधव,प्राचार्य राधेश्याम घुगे,पोलीस पाटील संदीप नवघरे,सरपंच सुधाकर नवघरे,उपसरपंच आनंदा खडसे,गजाननभाई नवघरे,लक्ष्मण नवघरे,कबड्डी असोसिएशनचे वाशिम जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ उपाध्यक्ष रामभाऊ नवघरे,माजी.प.स.सदश्य बळीबाबा नवघरे बहुसंख्य गावकरी मंडळी उपस्थित होते.गणेश वाझुळकर हे मागील 8 वर्षांपासून शाळा सुरू होण्याच्या दीड तास अगोदरच येऊन इंग्रजी विषयाच्या जादा तासिका घेतात.इंग्रजी विषयात विद्यार्थी व्याकरणात परिपूर्ण होण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. यावर्षी त्यांनी जो विद्यार्थी 500 इंग्रजी चे शब्द पाठ करेल त्याला त्यांच्या कडून 1101 रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले होते त्यांच्या आव्हानाला साद देत तब्बल 52 विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाचे शब्द पाठ केले या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1101 रुपयांचे बक्षीस असे एकूण 57200 रुपयाचे रोख बक्षीस त्यांनी स्वतःकडून दिले.विद्यालयामध्ये भाषा अभ्यास मंडळाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम राबवून घेत असतात.त्यामध्ये स्वंयबचत योजनेच्या माध्यमातून गल्ला तयार करून बचतीचे महत्त्व प्रत्यक्ष समजावून सांगतात.लोकशाही चे महत्त्व विद्यार्थ्यांना समजण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधीची निवडणूक विद्यालयामध्ये घेत असतात. उन्हाळ्यात सुट्टीमध्ये सुद्धा त्यांचे इंग्रजी विषयाचे जादा वर्ग सुरूच असतात. तसेच गणेश वाझुळकर हे कीर्तन ही करतात कीर्तन हा त्यांचा समाज जागृती चा छंद असून त्यासाठी ते कोणत्याही प्रकारचे शुल्क घेत नाहीत यामुळेच त्यांना ह.भ.प.गणेश महाराज वाझुळकर म्हणून संभोधल्या जाते.सत्कारामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली असून जास्तीत जास्त विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करणारं असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

मालेगाव@सोयल पठाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news