लाखोंच्या गांजाची लागवड करणारा आरोपी दहीहांडा पोलीसांच्या जाळयात तब्बल १२ किलो गांजा जप्त

लाखोंच्या गांजाची लागवड करणारा आरोपी दहीहांडा पोलीसांच्या जाळयात तब्बल १२ किलो गांजा जप्त

दहीहांडाे: प्रतीनीद्दी :दिपक भांडे दिनांक २९/०१/२०२४ पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असतांना ठाणेदार सहा पोलीस निरीक्षक योगेश वाघमारो यांना चोहटटा बिट हददीतील ग्राम करतवाडी येथे एका इसमाने गांजाच्या झाडाची लागवड स्वतःचे घराचे अंगणात केली असलेबाबत खात्रीलायक माहिती मिळाली. सदर माहिती ताबडतोब मा. पोलीस अधिक्षक साहेब, उप्पर पोलीस अधिक्षक साहेब, सहा पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांना दिली. सदरचा प्रकार हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी मिळालेल्या माहितीची खातरजमा करून एनडिपीएस कायदया अंतर्गत कडक कार्यवाही करण्याबाबत परवानगी दिली.

लागलीच ठाणेदार योगेश वाघमारे यांनी एक पथक तयार केले. सदर कार्यवाही करीता मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनमोल मित्तल साहेब हे स्वतः उपस्थित राहीले त्या नंतर पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्राम करतवाडी येथे छापा कार्यवाही केली असता इसम नामे अजाबराव रामदास किरडे वय ४६ वर्ष रा करतवाडी रेल्वे याने स्वतःचे घराचे अंगणात कंपाउंड वॉलचा आडोसा घेवुन १२ गांजाची झाडे लावल्याची आढळले. पोलीस पथकाने सदर झाडांचा पंचासमक्ष पंचनामा करून १२ किलो वजनाची सुमारे १,२०,०००/- रूपये किंमतीची गांजाची झाडे ताब्यात घेवुन आरोपी अजाबराव किरडे याला अटक केली आरोपीला मा. न्यायालय समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने दोन दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड मंजुर केला आरोपी कडुन अजुन काही माहिती निष्पन्न होते का याचा तपास दहीहांडा पोलीस करीत आहेत.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चनसिंह साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे साहेब व सह पोलीस अधिक्षक श्री अनमोल मित्तल साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक योगेश वाघमारे, पोउपनि अरून मुंढे, एएसआय अंबादास नेरकर, पोहेका गोपाल अघडते, पोहेका सुधाकर सिरसाट, पोहेका शरद सांगळे, पोहेका अनिल भांडे, पोहेका कमोद लांडगे, पोका योगेश करनकार, पोका रामेश्वर भगत, पोका निलेश देशमुख, मपोका श्रध्दा वानखडे चालक एएसआय प्रकाश महाजन, पोहेका सुधीर कोरडे, पोका हेमंत दासरवार यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news