यशाची शिखरे मेहनतीनेच चढावी लागतात. –  स्नेह प्रभादेवी गहिलोत

यशाची शिखरे मेहनतीनेच चढावी लागतात. –  स्नेह प्रभादेवी गहिलोत

तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे आज इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांन करिता निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे इयत्ता दहावीच्या व बारावीच्या विद्यार्थ्यांन करिता निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर च्या सचिव सौ स्नेहप्रभादेवी गहिलोत ह्या अध्यक्ष भाषणामध्ये मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना जर आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचायचे असेल तर अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास करावा लागेल तेव्हाच अशा प्रकारची शिखरे पादाक्रांत करता येतील. पातुर पोलीस स्टेशनचे नव नियुक्त पोलीस सब इन्स्पेक्टर अभिषेक नवघरे हे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून लाभले त्यांनी विद्यार्थ्यांना एमपीएससी व यूपीएससी बद्दल बरीचशी माहिती दिली आणि आपल्या जीवनातील समस्या कशा निवारता येतील याबाबतीत मार्गदर्शन केले. स्वतःच्या जीवनातील अडीअडचणीवर मात करून आणि अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास करून यश कसे मिळविले याबद्दल सविस्तर चर्चा विद्यार्थ्यांसोबत केली. आणि भविष्यात जर स्पर्धा परीक्षे बद्दल काही माहिती लागल्यास आपण मोफतपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू. मोबाईलच्या अतिवापरामुळे कशाप्रकारे नुकसान होत आहे आणि याचे दुष्परिणाम येणाऱ्या पिढीला कशाप्रकारे भोगावे लागतील याबाबतीत सुद्धा विद्यार्थ्यांना त्यांनी ज्ञानाची माहिती दिली. बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर चे व्यवस्थापक विजयसिंहजी गहिलोत यांनी विद्यार्थ्यांना सतत प्रयत्न, चिकाटी, जिद्द ही विद्यार्थ्याला जीवनात कशाप्रकारे यशस्वी बनविते याबाबतीत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य अंशुमानसिंह गहिलोत यांनी केले. सोबतच शाळा ही शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर सार्वत्रिक क्षेत्रात कशाप्रकारे अग्रेसर आहे. याबाबतची माहिती उपस्थित पाहुणे मंडळी व पालक मंडळीला दिली. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दरम्यान आणि परीक्षेच्या पूर्वी कोणत्या खबरदारी घ्यायला पाहिजेत याबाबतीत सविस्तर माहिती, आय कार्ड पासून तर लेखी पेपर कशाप्रकारे देतात याबाबत मार्गदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस बी चव्हाण यांनी केले.

शैक्षणिक सत्र 2022- 23 मध्ये इयत्ता दहावी व बारावी मध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे बक्षीसे, ट्रॉफी, सन्मान चिन्हे व रोख रक्कम देऊन आई-वडिलांसह सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पंकज वाकोडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकरिता प्रा विपिनसिंह गहिलोत यांनी विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त करण्याकरिता मार्गदर्शन केले. त्यामध्ये सानिका धनस्कार, आस्था पवार, चैताली वाघमारे, ज्ञानेश्वरी दांदळे, साक्षी सालोकार, संजना सिरसाट यांनी मनोगत व्यक्त केले व आयुष्यामध्ये ज्ञानाची शिदोरीत येणाऱ्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे वापरू याबाबतीत विचार व्यक्त केले.
*कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून स्नेहप्रभादेवी गहिलोत सचिव बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर, व्यवस्थापक प्रमुख अतिथी विजयसिंह गहीलोत, प्रमुख अतिथी तथा प्रमुख मार्गदर्शक पातुर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पीएसआय अभिषेक नवघरे, प्राचार्य अंशुमानसिंह गहीलोत, उपप्राचार्य एस बी चव्हाण, पर्यवेक्षिका पी एम कारस्कर, जगमोहनसिंह गहिलोत, बहुसंख्येने बक्षीस पात्र विद्यार्थी व पालक सुद्धा उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याकरिता तालुक्यातील पत्रकार देवानंद गहिले, कुद्दुसभाई, किरण निमकंडे, अविनाश पोहरे, निखिल इंगळे हे सुद्धा उपस्थित होते. निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुभाष इंगळे तर आभार प्रदर्शन अलका बैस यांनी केले.

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news