शहर वाहतुक नियंत्रण शाखा यांची क्षमतेपेक्षा जास्त विदयार्थी वाहुन नेणारे स्कुल बस, शाळकरी ऑटोवर कारवाई!

शहर वाहतुक नियंत्रण शाखा यांची क्षमतेपेक्षा जास्त विदयार्थी वाहुन नेणारे स्कुल बस, शाळकरी ऑटोवर कारवाई!

शहर वाहतुक नियंत्रण शाखा यांची विशेष मोहीम!

अकोला जिल्हयातील पोलीस अधीक्षक मा. श्री. बच्चन सिंग साहेब यांचे संकल्पनेतुन व पोलीस निरीक्षक सुनिल किनगे वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे मार्गदर्शनात शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला व अकोला जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत क्षमतेपेक्षा जास्त विदयार्थी वाहून नेणारे स्कुल बस, शाळकरी मुलांचे ऑटो यांचेवर कलम ६६/१९२ मोवाका प्रमाणे नियमांचे उल्लंघन करणारे वाहनांवर कार्यवाही करण्याकरीता संपूर्ण अकोला जिल्हयात दिनांक ३०/०१/२०२४ ते ०३/०२/२०२४ दरम्यान विशेष मोहीम राबवीण्यात आली होती.

सदर मोहीम दरम्यान शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला व जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व अमंलदार यांचेकडुन क्षमतेपेक्षा जास्त विदयार्थी वाहुन नेणारे स्कुल बस, शाळकरी मुलांचे ऑटो यांचेवर कलम ६६/१९२ मोवाका अन्वये एकुण ३३४ वाहनांवर केसेस करून ३३,४०,०००/- रू दंड आकारण्यात आला असुन नमुद सर्व प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात येत आहेत.

करीता वाहन धारकांनी वाहन चालवितांना परमीटचा उल्लंघन करू नये. उल्लंघन केल्यास कायदेशी कार्यवाही करण्यात येईल व वाहन निलंबन प्रस्तवा उपप्रदेशिक परिवाहन विभाग यांचेकडे सादर करण्यात येईल. तसेच वाहन चालवितांना सोबत वाहनांचे कागदपत्रे बाळगावे, वाहतुक नियमांचे पालन करावे व आपले वाहनावर पेंडीग दंड असल्यास त्वरीत वाहतुक पोलीस किंवा शहर वाहतुक कार्यालय येथे दंड भरावा, असे आवाहन मा. श्री. बच्चन सिंग साहेब पोलीस अधीक्षक अकोला यांनी अकोल जिल्हयातील नागरीकांन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news