खेंडकर ज्ञानगंगेमध्ये रंगारंग संगीतमय सांस्कृतिक स्नेहसंमेलन उत्साहात

खेंडकर ज्ञानगंगेमध्ये रंगारंग संगीतमय सांस्कृतिक स्नेहसंमेलन उत्साहात

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची महत्त्वाची भूमिका- आ. किरणराव सरनाईक

वाशिम बायपास स्थित खेंडकर ज्ञानगंगा मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात प्रमिलाताई ओक सभागृहामध्ये 6 फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णुपंत खेंडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक निलेश खेंडकर तर स्वर्गीय यमुनाबाई खेंडकर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अलकेश खेंडकर, तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन बालरोग तज्ञ डॉक्टर सुभाषजी भागडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद सदस्य एड. किरणराव सरनाईक, अकोला मनपा प्रशासन अधिकारी अनिल बिडवे, मुख्याध्यापक बिडकर साहेब तसेच संस्थेच्या कोषाध्यक्ष मृणालिनी खेंडकर व उपाध्यक्ष अस्मिता खेंडकर यांची प्रार्थनीय उपस्थिती होती. दरम्यान विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची महत्त्वाची भूमिका असते, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आ. किरणराव सरनाईक यांनी केले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कोळीगीत, शेतकरी नृत्य, लावणी, राजस्थानी नृत्यावर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून दर्शकांना मंत्रमुग्ध केले. सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान ४ फेब्रुवारी रोजी शाळेतील महिला पालक वर्गांकरिता विविध खेळ स्पर्धेमध्ये उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची व फॅन्सी ड्रेस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते; या स्पर्धेमध्ये विजेता महिला पालकांना शुभेच्छा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. फॅन्सी ड्रेस स्पर्धे मध्ये प्रथम प्रियंकाताई सुरडकर, द्वितीय भाग्यश्रीताई हरणे, तृतीय दिपालीताई शेळके; उखाणे स्पर्धेमध्ये प्रथम वृषालीताई देशमुख, द्वितीय चंदाताई पवार, तृतीय रमाताई ओवाळ तर संगीत खुर्ची मध्ये प्रथम तरन्नुम मोहम्मद जावेद, द्वितीय प्रीती वाडेकर, तृतीय शितल हडकर यांनी स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवून विजय प्राप्त केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

तसेच मागील वर्षी वर्ग दहावी मधील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते मेडल देऊन गौरव करण्यात आला; यामध्ये मार्च 2023 बोर्ड परीक्षे मधील शाळेमधून प्रथम आलेली कु. प्रेरणा राजेश मलीये हिला गोल्ड, द्वितीय कु. तन्वी संतोष साळुंके हिला सिल्वर तर तृतीय वैभव दीपक गीते याला ब्राॅज मेडल देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी शाळेमधून खेळाडू विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला वर्ग आठवी मधील अदनान शहा सलीम शहा याला राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये गोल्ड रोहित श्रीकृष्ण तायडे ह्याला सिल्वर तर वर्ग नववी मधील रिजवान शाह सलीम शाह याला ब्रोन्स तसेच वर्ग आठवी मधील ऋषी राम अवतार तिवारी याला राज्यस्तरीय कुस्तीमध्ये सिल्वर मेडल मिळाल्याबद्दल सर्व खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्राथमिक संचालन आशा हिवरकर तर आभार प्रदर्शन उषा जगदाळे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे संगीतमय संचालन वर्ग नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी कु. अंजली निकामे, कु. चंचल पवार, कु. श्रद्धा सोनटक्के, कु. निशा येहेकार, कु. नेहा मुंढे, कु. श्रुती ठाकूर यांनी पार पाडले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेमधील शिक्षक प्रज्ञानंद थोरात, गोपाल वानखडे, श्रीकांत पागृत, सुरेश सुरत्ने, प्रशांत काळे, कांचन वानखडे, मिना घाटोळे, मनीषा अंभोरे, अश्विनी सोळंके, पल्लवी हिंगणकर, शितल तिवारी, अंजु मुंढे, यामीनी उपश्याम, रूपाली उन्हाळे, शारदा पांडे, कांचन तायडे, जया तेलगोटे, संचीता भालतीलक तर शिक्षकेत्तर कर्मचारी मंजूताई कदम व संतोषदादा कदम यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news