पातुर नगरीचे विकासाचे शिल्पकार स्वर्गीय अण्णासाहेब अत्तर कार यांना भावपूर्ण आदरांजली कार्यक्रम

पातुर नगरीचे विकासाचे शिल्पकार स्वर्गीय अण्णासाहेब अत्तर कार यांना भावपूर्ण आदरांजली कार्यक्रम

पातुर तालुका प्रतिनिधी

पातुर नगरीच्या विकासाचे शिल्पकार…

1957 चे पातुर नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष सातत्याने ज्यांनी 17 वर्ष पदभार सांभाळला तसेच खरेदी- विक्री सोसायटी पातूरचे प्रथम अध्यक्ष म्हणुन पंधरा वर्ष पदभार सांभाळला व्हिलेज कौन्सिलर सदस्य पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सदस्य स्वातंत्र्यसैनिक माजी नगराध्यक्ष तसेच हॉकीचे राष्ट्रीय खेळाडू ज्यांनी शंभर मीटर रनिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले व कुस्ती तसेच इतर खेळांमध्ये एकूण 41 पदक मिळवलेले सुधाकरराव नाईक उच्च माध्यमिक शाळा शेकापूर फाटा येथे कार्यरत असलेले सुप्रसिद्ध कवी प्रा. विजय अत्तरकार यांचे आजोबा स्वर्गीय अण्णासाहेब अत्तरकार यांचा आज 38 वा पुण्यतिथी दिवस आहे.
त्यानिमित्त पातुर येथील अण्णासाहेब अत्तरकार सार्वजनिक वाचनालय येथे स्वर्गीय अण्णासाहेब
अत्तरकार यांच्या मूर्तीचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले
यावेळी अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय संघटक जेष्ठ पत्रकार देवानंद गहिले,
अण्णासाहेब अत्तरकार सार्वजनिक वाचनालयाचे मुख्य संचालक सुधाकर उगले, पुष्पाताई डोंगे इंगळे, पातुर शहरातील ज्येष्ठ नागरिक तथा पैलवान शामरावजी बारतासे, लोकसेवा बिछायत केंद्र चे प्रकाश भाऊ निमकंडे, पातूर शहरातील ज्येष्ठ पमहिला नागरिक सौ. वेणूताई निमकंडे, श्रीराम बोचरे, श्री पोतदार, श्री रेणुका माता मंदिर संस्थान भक्त शशी भाऊ अत्तर कार, आदीसह इतर मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

निखिल इंगळे सह किरण निमकंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news