मराठी दिनी मराठी भाषेचा सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला मराठी दिवस साजरा

मराठी दिनी मराठी भाषेचा सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला मराठी दिवस साजरा

पत्रकार, कवी, साहित्यिक, यांचा सत्कार

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

पातुर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठी भाषेला राजश्रय मिळावा म्हणून सदैव तत्पर असनारे राज ठाकरें यांच्या आदेशानुसार पातुर शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी दिनानिमित्त मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातील नामवंत दिवंगत कुसुमाग्रज, लेखक यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आल्या कवी धनंजय मिश्रा यांनी कवितेतून उपस्थितांची मने जिंकली तर छोटू जोशी यांनी ठाकरे घरान्यावर लेख सादर केला या कार्यक्रमाचे मुख्य प्रमुख उपस्थिती म.न.से जिल्हा अध्यक्ष राजेश काळे , संपर्क अध्यक्ष संजय पळसकर , जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कराळे , बाळापूर ता. अध्यक्ष विनोद राहुलकार महीला जिल्हा अध्यक्षा सौ प्रशंसा अंबेरे , उज्वला निंबाळकर, सुषमा पाटील, किसनराव गावंडे, पातुर तालुका अध्यक्ष डॉ प्रशांत लोथे पातुर शहर अध्यक्ष विलास धोंगडे यांची उपस्थिती होती तर म.न.से कार्यकर्ते यांनी मराठी दिनानिमित्त पत्रकार, कवी ,साहित्यिक, यांचा सत्कार पेन व डायरी देऊन केला, या कार्यक्रमाचे आयोजन पातुर शहरातील संत सिदाजी महाराज मंदिर परिसरातील सभागृहात करण्यात आला या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजाराम देवकर हे होते तर, पातुर तालुका मराठी पत्रकार मुंबई सलग्नीक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सतीश सरोदे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवानंद गहिले, बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष निशांत गवई तसेच कवी, म्हणून लाभलेले धनंजय मिश्रा, डॉ शांतीलाल चव्हाण, गोविंदराव देशमुख, प्राध्यापक विलास राऊत, छोटू भाऊ जोशी , प्रशांत निकम,विठोबा गवई, यांच्या सह पत्रकार प्रदिप काळपांडे,मोहन जोशी, माजी अध्यक्ष कुदूस शेख, निखिल इंगळे, किरण कुमार निमकंडे, स्वप्निल सुरवाडे, दुलेखा युसुफ खान,श्रीकृष्ण शेगोकार, संजय गोतरकार, प्रमोद कढोणे, हसणं बाबु , नाजीम शेख, फरहान भाई, गौस भाई,भारतीताई गाडगे, संगीताताई इंगळे, स्नेह लताताई ताले, स्वातीताई जोशी, यांचा सत्कार करण्यात आला तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ प्रशांत लोथे यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म.न.से तालुका अध्यक्ष डॉ प्रशांत लोथे, पातुर शहर अध्यक्ष विलास धोंगडे, अमोल चापाईतकर, आकाश वानखडे, किरण राऊत, राहूल भगत ,कैलास ठक, यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news