अखेर अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक घोषित!

अखेर अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक घोषित!
अनेकांनी बांधले पश्चिम विधानसभेसाठी बाशिंग!

अकोला – १९ एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक सुरू होणार असून, ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे, तर महाराष्ट्रात ५ टप्प्यांत निवडणूक होणार असल्याचंही या वेळी राजीव कुमार यांनी सांगितलं. या वेळी त्यांनी विविध राज्यातील पोट निवडणुका कधी होणार, याची माहितीदेखील दिली. यामध्ये
अकोला पश्चिम विधानसभा निवडणूक घोषित करण्यात आली आहे. ही पोटनिवडणूक आ. गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे घेण्यात येत आहे. ही निवडणूक लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. निवडणूक शुक्रवार 26 एप्रिल रोजी होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत अकोला पश्चिमची पोटनिवडणूक होणार असून, याचा निकाल 4 जूनला लागणार आहे. पोटनिवडणुकीचा निकाल इतक्या उशिराने लागण्यामागचे कारण निवडणूक आयोगाने निश्चित करण्याची गरज आहे. यामुळे निवडलेल्या आमदाराला जास्त कार्यकाळ काम करता येणार नाही, अशी ओरड राजकीय नेत्यांची आहे.लोकसभेबरोबरच महाराष्ट्रातील पोटनिवडणूक आयोगाकडून जाहीर केली आहे. देशातील लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्यानुसार यंदाची लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत पार पडणार आहे. अकोला पश्चिम विधानसभा
पोटनिवडणुकीचा निकाल इतक्या उशिराने लागण्यामागचे कारण निवडणूक आयोगाने निश्चित करण्याची गरज आहे. यामुळे निवडलेल्या मात्र पश्चिम मतदार संघातील आमदाराला जास्त कार्यकाळ काम करता येणार नाही हे मात्र तितकेच खरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news