नाना पटोलेंच्या कारचा अपघात, ट्रकची जोरदार धडक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली.

सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नाही. कारला धडक बसली तेव्हा कारमधील सर्वजण खाली उतरल्याने कोणालाच इजा झाली नाही. मात्र यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नाना पटोले हे या अपघातामधून थोडक्यात बचावले आहेत. अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. पुढील तपास सुरू आहे. ट्रकचालकाचे ट्रकवरील नित्रंयण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news