शिंदे गटच खरी शिवसेना, दोन्ही गटाचे आमदार पात्र; नार्वेकर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या निकालाचं वाचन केलं. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी विधीमंडळ पक्ष ज्यांचा त्यांचाच राजकीय पक्ष असा मोठा निकाल दिला. त्यामुळे खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला. विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावले यांची प्रतोद पदी नियुक्ती वैध ठरवली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सर्व 16 आमदार विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवले आहेत. विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटाला पूर्णपणे दिलासा मिळाला. तर ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देण्यात आले. पण या निकालात ठाकरे गटाला एक मोठा दिलासा नक्कीच मिळाला. विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाचे देखील सर्व आमदार पात्र ठरवले आहेत. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा एक महत्त्वाचा दिलासा मानला जातोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news